माझा जिगरी दोस्त विजय कुलकर्णी याची एक कविता ..
विरह
विरहाचे दिवस माझ्याच वाट्याला येतात
श्वासा गणिक तुझ्या आठवणी देतात
प्रकाश तुझा दिसताच
अंधार दूर पळून जातो
जणू तुझ्या जाण्याची वाट
तो दडी मारून पाहतो
ते स्वप्नातील क्षण कवेत मला घेतात
विरहाचे दिवस माझ्याच वाट्याला येतात
ओघळणारे थेंब तुझ्या गालावर येतात
जणू तुझं सौंदर्य ते चोरून पितात
झाडांचे मोहर जिथे लागून लागून झडतात
त्या झाडाखाली माझ्या आठवणींचे सडे पडतात
त्या सड्यांचे गंध वारे दूरवर नेतात
विरहाचे दिवस माझ्याच वाट्याला येतात
क्षितीजापलीकडे जिथे सुर्य धरतीला भेटतो
जणू आसमंत सारा तिथे नतमस्त होतो
त्या प्रेमाला कशाचीही उपमा शोभणार नाही
कारण तिथे आठवणींला थारा नाही
लूडबूड करणारा वारा नाही
पावसाच्या धारा नाही
तिथे फक्त सुखं नांदत असतात
वेदना देवांच्या वाटेला का जातात ?
विरहाचे दिवस मात्र माझ्याच वाट्याला येतात
श्वासागणिक तुझ्या आठवणी देतात..
- विजय कुलकर्णी
No comments:
Post a Comment